मित्रांनो

आपणास काही अर्ज किंवा प्रस्ताव किंवा इतर कार्यालयीन कामासाठी जन्म प्रमाणपत्र किंवा मूत्यू प्रमाणपत्राची आवश्यकता असते. काही कारणास्तव आपली जन्म किंवा मृत्यूची नोंद झालेली नसते. आणि सध्या प्रत्येक ठिकाणी ऑनलाईन झालेले जन्म किंवा मृत्यू प्रमाणपत्र कॉपी अर्जासोबत जोडावी लागते. ग्रामपंचायतला विहित मुदतीत नोंद न झाल्यामुळे आपणास प्रमाणपत्र मिळविण्यास अडचण येते.

  1. 0 ते 21 दिवसाच्या आत ग्रामपंचायत कार्यालयाकडे नोंद करावी लागते
  2. 21 ते 1 वर्षाखालील नोंद असेल तर मा.गट विकास अधिकारी पंचायत समितीकडे अर्ज करून आदेश मिळवावा लागतो आणि त्यानंतर ग्रामपंचायत कडे नोंद करून ऑनलाईन नोंद केली जाते.
  3. 1 वर्षावरील नोंदी असतील तर मा.तहसीलदार ह्यांचे कडे अर्ज करून आदेश मिळवावा लागतो आणि त्या नंतर ग्रामपंचायत कडे नोंद करून त्या नोंदी ऑनलाईन केल्या जातात.

अशावेळी आपणास तहसीलदार यांचे कडे अर्ज दाखल करावा लागतो. ह्या अर्जाचा नमुना खालीप्रमाणे माहिती भरून pdf स्वरुपात डाउनलोड करून घेवू शकता. त्या साठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही. आपणास योग्य वाटेल तर खालील प्रमाणे माहिती भरा आणि अर्ज डाउनलोड करा.

महत्वाची सूचना – 1 वर्षावरील जन्म/मृत्यू साठीचा अर्ज डाउनलोड झाल्यावर, जन्म नोंद अर्जासाठी जन्म ह्या शब्दावर (√) अशी टिक मार्क करावी. मृत्यू नोंद अर्जासाठी तर मृत्यू ह्या शब्दावर (√) अशी टिक मार्क करावी

( महत्त्वाची सुचना : सदरील अर्ज व सोबतचे अहवाल, पंचनामा नमुना हे केवळ मार्गदर्शक असून सावर्जनिक आरोग्य विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या शासन निर्णय दि १२ मार्च २०२५ मध्ये दिलेल्या मार्गदर्शक सुचनेनुसार तयार करण्यात आलेले आहे. कुठलीही  विसंगती वाटल्यास मूळ शासन निर्णय, अधिनियम प्रमाणभूत मानावा )

जन्म / मृत्यू नोंदणी अर्ज


1 Comment

Kavita wakle · 04.02.2026 at 7:03 pm

खूप छान माहिती आणि खूप ईजी माहिती मिळाली sir thank you sir

Leave a Reply

Avatar placeholder

Your email address will not be published. Required fields are marked *