केंद्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागाद्वारे राष्ट्रीय डिजिटल पशुधन अभियानाची (NDLM) ची अंतर्गत “भारत पशुधन” प्रणाली कार्यान्वित केली आहे. सदर प्रणालीमध्ये ईअर टॅगिंग (१२ अंकी बार कोडेड) केलेल्या सर्व पशुधनाच्या सर्वकष नोंदी घेण्यात येत आहेत. यामध्ये जन्म-मृत्यू नोंदणी, प्रतिबंधात्मक लसीकरण व ओषधोपचार, वंध्यत्व उपचार, मालकी हक्क हस्तांतरण यांचा समावेश आहे. थोडक्यात सदर प्रणालीवर संबंधित पशुधनाची प्रजनन, आरोग्य, मालकी हक्क, जन्म-मृत्यू, इ. सर्व माहिती उपलब्ध होते. पशुधनाच्या कानात Ear Tagging करून राष्ट्रीय डिजिटल पशुधन अभियानाची (NDLM) ची अंतर्गत भारत पशुधन प्रणालीवर पशुधनाचे लसीकरण, प्रजनन, उपचार आणि खरेदी-विक्री इ. सर्व नोंदी घेतल्यामुळे वास्तव कालीन माहिती (Real Time Database) तयार होणार आहे. सदर माहितीचा उपयोग रोगप्रादुर्भाव मध्ये रोगनियंत्रण करिता लस वितरण, शित साखरी व्यवस्थापन आणि लसीकरण मोहिमेच्या अचूक नियोजनासाठी होणार आहे. ही बाब विचारात घेऊन शासन निर्णयान्वये राज्यातील सर्व पशुधनाचे एअर टॅगिंग करून त्यांची नोंदणी भारत पशुधन प्रणालीवर नोंद करणे बंधनकारक केले आहे.

भारत पशुधन प्रणालीवर पशुधनाची नोंद करण्याचे महत्त्व व आवश्यकता विचारात घेऊन “पशुंधन मधील संसर्गजन्य रोगांचे प्रतिबंध आणि नियंत्रण अधिनियम, २००९” मध्ये ३१ मध्ये तरतुदीस अनुसरून शहरी भागासाठी तसेच, ग्रामीण भागात गाव, गट, तालुका जिल्हा व राज्य स्तरावर प्रभावी डेटा व्यवस्थापनासाठी विविध राष्ट्रीय डिजिटल पशुधन अभियानाची (NDLM) ची समन्वय अधिकार्यांची नेमणुक करण्याचे निर्देश केंद्र शासनाने दिले आहेत. त्यानुसार राष्ट्रीय डिजिटल पशुधन अभियानांतर्गत प्रभावी डेटा व्यवस्थापनासाठी (NDLM) ग्रामीण भागातील ग्रामपंचायत, गट, तालुका, जिल्हा व राज्य स्तरावर “राष्ट्रीय डिजिटल पशुधन अभियान अधिकारी” यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

शासन निर्णय

राष्ट्रीय डिजिटल पशुधन अभियानाची (NDLM) ची प्रभावी डेटा व्यवस्थापनासाठी ग्रामीण भागात ग्रामपंचायत, गट, तालुका, जिल्हा व राज्य स्तरावर “राष्ट्रीय डिजिटल पशुधन अभियान अधिकारी” यांची नियुक्ती करण्यास पुढीलप्रमाणे शासन मान्यता देण्यात आली आहे.

१. ग्रामपंचायत स्तरावरील“राष्ट्रीय डिजिटल पशुधन अभियान अधिकारी” (PNO):-

पशुसंवर्धन विभागाच्या अधिपत्याखाली कार्यरत असणाऱ्या पशुवैद्यकीय चिकित्सालयांमधील पशुधन पर्यवेक्षक यांना ते कार्यरत असलेल्या पशुवैद्यकीय चिकित्सालयाच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या प्रत्येक गावासाठी “राष्ट्रीय डिजिटल पशुधन अभियान अधिकारी” म्हणून नियुक्त करण्यात येत आहे.
वरील प्रमाणे नियुक्त करण्यात आलेल्या “राष्ट्रीय डिजिटल पशुधन अभियान अधिकारी” यांना संबंधित गावातील पशुधनाची जन्म, मृत्यु, खरेदी विक्री यामुळे पशुधनाच्या संख्येत होणारा बदल व आजार याबाबतची माहिती देण्याची जबाबदारी त्या गावातील “ग्रामविकास अधिकारी” यांची राहील. त्यानुसार “राष्ट्रीय डिजिटल पशुधन अभियान अधिकारी” तथा पशुधन पर्यवेक्षक व संबंधित “ग्रामविकास अधिकारी” यांची संयुक्तपणे जबाबदारी पुढीलप्रमाणे राहील.

कार्य व जबाबदार्या:

i. ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील सर्व पशुधन आणि पशुधन मालकांचा आधार आणि मोबाईल क्रमांक याबाबतची माहिती ग्रामविकास अधिकारी यांनी “राष्ट्रीय डिजिटल पशुधन अभियान अधिकारी” यांना उपलब्ध करून घावी.
ii. ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील पशुधनाच्या संख्येत होणारे सर्व बदल (जन्म, मृत्यु, खरेदी-विक्री इत्यादी), पशुधनात आलेल्या सांसर्गिक आजारांची माहिती याबाबतची माहिती ग्रामविकास अधिकारी यांनी “राष्ट्रीय डिजिटल पशुधन अभियान अधिकारी” यांना उपलब्ध करून घावी.

iii. उपरोक्त (i) व (ii) प्रमाणे प्राप्त झालेल्या माहितीची अचूक व पूर्ण नोंद “राष्ट्रीय डिजिटल पशुधन अभियान अधिकारी” यांनी राष्ट्रीय डिजिटल पशुधन अभियानाची (NDLM) ची प्रणालीवर घ्यावी.
iv. पशुधनात आलेल्या सांसार्गीक आजारांची माहिती पशुवैद्यकीय अधिकार्यांच्या निदर्शनास आणण्यासाठी राष्ट्रीय डिजिटल पशुधन अभियानाची (NDLM) ची पोर्टलवर त्वरित नोंद करावी.
v. राष्ट्रीय डिजिटल पशुधन अभियानाची (NDLM) ची मार्गदर्शक सुचनानुसार सर्व पशुवैद्यकीय सेवा NDLM पोर्टलद्वारे च पुरवल्या जातील याची दक्षता “राष्ट्रीय डिजिटल पशुधन अभियान अधिकारी” यांनी घ्यावी.
vi. NDLM पोर्टलच्या अनुसंगाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सुचनांची काटेकोर अंमलबजावणी करणे.

  1. गट स्तर (Cluster level ) वरील “राष्ट्रीय डिजिटल पशुधन अभियान अधिकारी” (CNO) :-

पशुसंवर्धन विभागाच्या अधिपत्याखालील पशुवैद्यकीय चिकित्सालयांमधील “पशुधन विकास अधिकारी” यांना पशुवैद्यकीय चिकित्सालयांच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या गावांसाठी गट पातळीवरील (Cluster level) “राष्ट्रीय डिजिटल पशुधन अभियान अधिकारी” म्हणून नियुक्त करण्यात येत आहे.
सदर अधिकारी त्यांच्या कार्यक्षेत्रातील ग्रामपंचायत स्तरावरील“राष्ट्रीय डिजिटल पशुधन अभियान अधिकारी” (PNO) यांच्या कामकाजावर नियंत्रण ठेवतील.

कार्ये व जबाबदार्या:

i. कार्यक्षेत्रातील NDLM री संबंधित सर्व कामांचे संनियंत्रण करणे.
ii. PNO द्वारे नंदवलेल्या सांसार्गीक आजारांच्या घटनांची शहानिशा करणे.
iii. NDLM पोर्टलवर नियमितपणे अचूक व अद्यावत नंदी करणे.
iv. राष्ट्रीय डिजिटल पशुधन अभियानाची (NDLM) च्या मार्गदर्शक सुचनानुसार अधिनस्थ कार्यक्षेत्रात देणाऱ्या पशुवैद्यकीय सेवा NDLM पोर्टलद्वारे दिल्या जातील याची दक्षता घेणे.
v. कार्यक्षेत्रातील सर्व क्षेत्रीय अधिकारी / कर्मचार्यांचे User Accounts तयार करणे आणि त्यांचे व्यवस्थापन करणे.
vi. राष्ट्रीय डिजिटल पशुधन अभियान पोर्टलच्या अनुसंगाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सुचनांची काटेकोर अंमलबजावणी करणे.

  1. तालुका स्तर (Block level) वरील “राष्ट्रीय डिजिटल पशुधन अभियान अधिकारी” (BNO) :-

पशुसंवर्धन विभागाच्या अधिपत्याखाली सहायक आयुक्त पशुसंवर्धन, तालुका लघु पशुवेद्धकीय सर्वचिकित्सालय यांना तालुका पातळीवरील (Block level) “राष्ट्रीय डिजिटल पशुधन अभियान अधिकारी” म्हणून नियुक्त करण्यात येत आहे.

कार्ये आणि जबाबदार्या:

i. तालुक्यातील PNO आणि CNOs यांच्या कामकाजासह राष्ट्रीय डिजिटल पशुधन अभियानांतर्गत होणास्था सर्व कामांचे पर्यवेक्षण करणे.
ii. राष्ट्रीय डिजिटल पशुधन अभियानांतर्गत केलेल्या नोंदीची अचूकता व नियमित नोंदी होत असल्याबाबतची सुनिश्चितता करणे.
iii. कार्यक्षेत्रातील PNO आणि CNOs यांनी पशुधनात आलेल्या सांसारिक आजारांच्या माहितीची राहाणिशा करून खात्री करणे.
iv. कार्यक्षेत्रातील सर्व क्षेत्रीय अधिकारी / कर्मचार्यांचे User Accounts तयार करणे आणि त्यांचे व्यवस्थापन करणे.
v. राष्ट्रीय डिजिटल पशुधन अभियानाची (NDLM) च्या मार्गदर्शक सुचनानुसार अधिनस्थ कार्यक्षेत्रात देणास्था पशुवेद्धकीय सेवा NDLM पोर्टलद्वारे च दिल्या जातील याची दक्षता घेणे.
vi. राष्ट्रीय डिजिटल पशुधन अभियान पोर्टलच्या अनुसंगाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सुचनांची काटेकोर अंमलवजावणी करणे.

  1. जिल्हा स्तर (District level) वरील “राष्ट्रीय डिजिटल पशुधन अभियान अधिकारी” (DNO) :-

पशुसंवर्धन विभागाच्या अधिपत्याखालील जिल्हा स्तरावर कार्यरत असलेल्या उपायुक्त पशुसंवर्धन यांना जिल्हा पातळीवरील (District level) “राष्ट्रीय डिजिटल पशुधन अभियान अधिकारी” नियुक्त करण्यात येत आहे.

कार्ये आणि जबाबदार्या:

i. जिल्ह्यातील राष्ट्रीय डिजिटल पशुधन अभियानांतर्गत करण्यात येणास्था सर्व कामकाजाचे समन्वयन करणे.
ii. कार्यक्षेत्रातील सर्व क्षेत्रीय अधिकारी / कर्मचार्यांचे User Accounts तयार करणे आणि त्यांचे व्यवस्थापन करणे.


सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेताक २०२५९२२१९९३६२११६०९ असा आहे.


0 Comments

Leave a Reply

Avatar placeholder

Your email address will not be published. Required fields are marked *