महिलमध्ये सुरक्षितता भावना निर्माण होण्यासाठी त्यांना पतीच्या मालमतेमध्ये हक्क देणे हो मूलभूत गरज आहे. भारलीय संस्कतीमध्ये पती-पत्नी यांना एकरूप “एक घटक मानला जातो. व प्राप्त संपती दोघांची असल्याचे मानले जाते. त्यामुळे स्त्रियांचा आत्मसन्मान बाढविण्यासाठी त्यांच्या असलेल्या घराची नोंद पती-पत्नी दोघांच्या नावे असणे अपेक्षित आहे. ब-याचवेळा पतीच्या निधनानंतर पत्नीच्या महिलांना अनेक अडचणींना सामोरे
जावे लागते, जर आधीच पती-पत्नी चे नाव महसूली दप्तरात असेल तर अशा अडचणी येणार नाहीत. यासाठी सुरक्षा म्हणून पती आणि पत्नीच्या संयुक नावे नोंद करणे आवश्यक आहे. यासाठी सर्व ग्रामपंचायत मध्ये पती-पत्नी च्या नावे नमुना नंबर 8 ला संयुक्तपणे नोंद करावे असे या शासन निर्णयात सांगितले आहे