मनरेगा अंतर्गत वैयक्तिक लाभ म्हणून सिंचन सुविधा या वर्गीकरणांतर्गत शेतकऱ्यांना सिंचन विहिरीचा लाभ देण्यात येतो. या सिंचन विहिरीसाठी सध्या रुपये चार लक्ष इतकी अनुदान मर्यादा आहे. या कामाचे अंदाजपत्रके अकुशल कमीत कमी ६०% आणि कुशल जास्तीत जास्त ४०% याप्रमाणे तयार करण्यात येतात. एका सिंचन विहिरीसाठी जवळपास ९०० अकुशल मनुष्य दिवस निर्मिती होते. दिनांक ०१.०४.२०२४ पासून केंद्र शासनाने मनरेगा अंतर्गत मजूरी दरामध्ये वाढ करून तो रूपये २९७ इतका अधिसूचित केलेला आहे. सदर मजुरी दराच्या ४०% इतका कुशल खर्च हा जवळपास १९८ रुपये इतका अनुज्ञेय आहे. म्हणजेच प्रति मनुष्य दिवस जवळपास महत्तम रुपये ५०० अकुशल व
कुशल म्हणून रक्कम अनुज्ञेय करता येवु शकते. या बाबी लक्षात घेता ९०० मनुष्य दिवसासाठी रुपये ४ लक्ष ५० हजार इतका खर्च अपेक्षित असून याशिवाय विहीर कामांमध्ये पाणी उपसणे व इतर अनुषंगिक बाबींसाठी जवळपास रुपये ५० हजार इतकी तरतूद ठेवण्यात आली बांधकाम विभागाच्या चालू दरसुचीनुसार व केंद्रशासनाच्या दिनांक ०१.०४.२०२४ पासून मनरेगा अंतर्गत लागू झालेले मजुरी दर रक्कम रूपये २९७/- प्रतिदिन विचारात घेऊन, सिंचन विहिरीच्या बांधकामाची सुधारित अंदाजित रक्कम
रूपये ४९९४०३/- एवढी या शासन निर्णय नुसार येत आहे. यानुसार सिंचन विहिर अनुदान रकमेची कमाल महत्तम मर्यादा रूपये ५ लक्ष करण्यास शासन मान्यता आलीआहे.